गराडे : सध्याचा काळ हा कोरोनाचा आहे. गेली दोन वर्षे आपण या संकटाचा सामना करत आहोत. या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अशाच प्रकारे येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याच्या तयारीला आपण लागलो आहोत. या लाटेचा सामना करण्यासाठी आपले आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाचा धैर्याने मुकाबला करा, असे आवाहन पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे अटल आरोग्यरथ आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजक राहुल शेवाळे यांच्या वतीने पुरंदर हवेली मतदारसंघात प्रत्येक गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुभारंभ प्रसंगी शेवाळे बोलत होते.
अटल आरोग्यरथ रथाचे आरोग्य तपासणीचा शुभारंभ पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती दत्ता काळे यांनी केले.
याप्रसंगी पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे, पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस श्रीकांत थिटे, भाजपा नेते सलिल जगताप, हवेली तालुका युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश भंडारी, सरपंच संजय कटके ग्रा.पं. सदस्य दिलीप कटके, मारुती कटके भैरवनाथ सेवा मंडळ अध्यक्ष बाबाजी घिसरे, अनिल ढवळे, सुनील ढवळे आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजनपुरंदर तालुका भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष विकास कटके, पुरंदर तालुका भाजपा उपाध्यक्ष अविनाश कटके, युवा मोर्चा उपाध्यक्ष हनुमंत साळुंखे, भिवरी भाजपा अध्यक्ष योगेश कटके, भाजपा नेते संदीप कटके, किरण कटके,पोपट कटके, बाळासाहेब नाटकर, श्रीकांत येळवंडे विशाल कटके, संतोष शिर्के, नामदेव कुंजीर, विजय कटके ,राहुल कटके, ईश्वर कटके यांनी केले.
प्रास्ताविक विकास कटके यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कटके यांनी केले. आभार हनुमंत साळुंखे यांनी मानले.
भिवरी (ता. पुरंदर ) येथे अटल आरोग्य रथ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणीचा शुभारंभ करीत असताना दत्ता काळे, समवेत राहुल शेवाळे ,दादासाहेब घाटे, विकास कटके, संदीप कटके, संजय कटके व इतर मान्यवर