शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लढा कोरोनाशी! पुण्यातील जम्बोमध्ये १४ वर्षीय मुलाला मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 7:49 PM

पालक झाले भावुक, करमाळ्यावरून आले होते उपचारांकरिता

ठळक मुद्देआठ दिवसांच्या उपचारानंतर मुलगा सुखरूप घरी

पुणे: अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाला घेऊन त्यांनी गाव सोडले. त्याला उपचार मिळतील या आशेने पुणे गाठले. पण, पुण्यात आल्यावर कुठेच बेड मिळेना. असहाय झालेल्या आई वडिलांनी 'जम्बो कोविड सेंटर'मध्ये धाव घेतली. मुलावर उपचार करण्याची आर्जवे केली. मुलाची अवस्था गंभीर होती. परंतु, डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. आठवड्याभराच्या उपचारांनंतर हा मुलगा ठणठणीत बरा झाला आहे. 

पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आदित्य सोनवणे (वय १४) या मुलाला घेऊन त्याचे आईवडील पुण्यात आले होते. त्याला कोरोना झाला होता. आर्थिक परिस्थती जेमतेमच असलेल्या आईवडिलांनी पुण्यातील जवळपास सगळ्या रुग्णालयात जाऊन त्याला उपचारांकरिता दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना पुण्यात कुठेच बेड उपलब्ध झाला नाही. शेवटी त्यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन मुलाला दाखल करून घेण्याची विनंती केली. मुलगा लहान असल्याने दाखल करून घेतील की नाही या भीतीने मुलाचे वय १६ सांगितले.

वास्तविक जम्बो कोविड सेंटर फक्त मोठ्या माणसांकरिता आहे. याठिकाणी लहान मुलांवर उपचार केले जात नाहीत. मुलाची तब्येत अत्यंत गंभीर होती. त्याला दाखल करून घेण्यात धोका सुद्धा होता. मात्र, डॉक्टर श्रेयांश कपाले यांनी त्याला दाखल करून घ्यायचा निर्णय घेतला. त्याच्यावर जम्बोमधील 'एचडीयु वॉर्ड'मध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्याची ऑक्सिजन पातळी खाली आली होती. १५ लिटर प्रति मिनिट या वेगाने ऑक्सिजन पुरवला जात होता.त्याच्यावर स्वतः डॉ. कपाले आणि वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक कटारिया हे उपचार करत होते. या काळात आईवडिलांची बेडसाठी बाहेर धावपळ सुरूच होती. जम्बोमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांचा योग्य परिणाम झाला. या मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. आठ दिवसांच्या उपचारांनंतर या मुलाला रविवार घरी सोडण्यात आले. 

जम्बो रुग्णालय मोठया माणसांकरिता आहे. लहान मुलांसाठी व्यवस्था नाही. मुलाची अवस्था सुद्धा गंभीर होती. आईवडिलांनी मुलाचे वय १६ सांगितले. त्याला दाखल करून घेत उपचार सुरू केले. या मुलाला वाचविण्यात यश आले. असे जम्बो कोव्हीड सेंटरचे डॉ  डॉ. श्रेयांश कपाले यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसGovernmentसरकारdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल