याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लष्कर भागात तक्रारदार युवक आणि त्याचा चुलतभाऊ घराजवळ थांबले होते. त्या वेळी आरोपी अरबाज शेख (वय २३, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राने तक्रारदार युवक आणि त्याच्या चुलतभावास मारहाण केली. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दोघेजण पसार झाले. याप्रकरणी अरबाज शेख याला अटक करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक राऊत तपास करत आहेत.
दअरबाज शेखने परस्पर विरोधी तक्रार दिली. शेख आणि त्याचा मित्र उपहारगृहातून घरी खाद्यापदार्थ पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघांनी बांबूने मारहाण केली तसेच दुचाकीची मोडतोड केल्याचे शेखने फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक शिळीमकर तपास करत आहेत.