पुणे : पुणे शहराला ड्रग चा विळखा पडला आहे. काेवळी पीढी यामध्ये बरबाद हाेत आहे. ड्रग तस्कर ललित पाटीलवर तुम्ही ९ महिने उपचार काेणत्या नियमानुसार केले. सामान्य माणसाला दाखल न करता हाकलून लावता. ललित पाटीलवर उपचार करणारे डाॅक्टर काेण आहेत त्यांची नावे जाहीर करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना पाठीशी घालू नका, अशी थेट मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून मध्ये केली. तसेच त्यांनी ललित पाटील याच्यावर उपचार करण्यासाठी शिंदे गटातील एका मंत्र्याचाही फाेन आल्याचा खुलासा केला.
धंगेकर यांनी मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात जाउन ससूनचे डीन डाॅ. संजीव ठाकुर यांची भेट घेतली आणि डाॅ. ठाकुर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांना डाॅ. ठाकुर यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने धंगेकर यांनी त्यांना चांगलेच सुनावले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी यावेळी अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकुर, अधीक्षक डाॅ. किरण कुमार जाधव, उपअधीक्षक डाॅ. सुजीत दिव्हारे आदी उपिस्थत हाेते.
धंगेकर यांनी अधिष्ठाता डाॅ. ठाकुर यांना यावेळी चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले की ससूनमध्ये सर्वसामान्यांना लवरक उपचार मिळत नाहीत. मग, ललित पाटीलला व इतर कैदयांना काेणत्या कारणमुळे तुम्ही ९ महिने ठेवले ते सांगा. डाॅ. ठाकुर यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यावर धंगेकरांनी तुम्ही मला गाेल गाेल फिरवू नका. थेट उत्तरे दया अथवा मला नाेंदी असलेले रजिस्टर दाखवा. जाेपर्यंत संबंधित डाॅक्टरांवर गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत मी माघार घेणार नाही, असाही पवित्रा त्यांनी यावेळी घेतला.