पुणे : रावण हा सर्वांना न्याय देणारा, न्यायप्रिय राजा हाेता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करुन रावणाला खलनायक ठरविण्यात अाले. तसेच दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. रावण हा अादिवासी, बहुजन समाजाचा नायक असल्याचे म्हणत भीम अार्मीकडून रावण दहनास विराेध करण्यात अाला अाहे. भीम अार्मीकडून पाेलीस अायुक्तालायाला निवेदन देण्यात अाले असून रावण दहनास परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात अाली अाहे. तसेच काेणी रावण दहन केल्यास अॅट्राेसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली अाहे. त्यामुळे अाता नव्या वादाला ताेंड फुटले अाहे. रावण हा मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक अाहे. उत्कृष्ट समासव्यवस्थेचा उद्गाता, सर्वांना समान न्याय देणारा न्याय प्रिय राजा हाेता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करुन परंपरेच्या नावाखाली रावणाला खलनायक ठरवून दरवर्षी त्याच्या प्रतिमेचे दहन केले जाते. ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची इतिहासात बदनामी केली गेली त्याप्रमाणे षडयंत्र अाखून सांसृतिकदृष्ट्या रावणाला उद्वस्त करण्याचा प्रयत्न इतिहासाच्या माध्यमातून केला जात अाहे. रावण हा अादिवासी, बहुजन समाजाचा नायक असल्याने त्याच्या दहनाला तीव्र विराेध असल्याचे भीम अार्मीने दिलेल्या निवेदनाता म्हंटले अाहे.
तसेच रावण दहन कार्यक्रमातून दलित, अादिवासी, अनुसुचित जाती-जमाती व समाजाचा अपमान हाेत असल्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकरण्याची मागणी करण्यात अाली अाहे. तसेच काेणी हा कार्यक्रम केल्यास त्यांच्यावर अॅट्राेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अाम्हाला रस्त्यावर उतरुन विराेध प्रकट करावा लागेल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाेलिसांची असेल असेही भीम अार्मीकडून सांगण्यात अाले अाहे.
दरम्यान यावर पाेलीस काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले अाहे.