याप्रकरणी कदमवाकवस्ती
ग्रामपंचायतीमध्ये वसुली क्लार्क हनुमंत सोमनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रघुराम आनंदा शेट्टी ( रा.पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रघुराम शेट्टी यांचे वडील आनंदा कोरागा शेट्टी ( वय ७० ) हे त्यांचे राहते घरी
आजारपणामुळे मयत झाले. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ - ३० थोरात हे सदर ठिकाणी गेले त्यावेळी तेथे ५० ते ६० लोक उपस्थित
असल्याचे दिसुन आले. कोविड १९ चे अनुशंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण यांचे आदेशान्वये अंत्यसंस्कार, दशक्रियाशी निगडित कार्यक्रमासाठी जास्तीत
जास्त २० लोकांचे उपस्थितीत करणेबाबत आदेश झाले असताना यांनी २० पेक्षा अधिक लोक अंत्यविधीसाठी जमवून सदर आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केलेले आहे. म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.