पुणे : एनसी एल येथील इनोव्हेशन पार्कमधील नोबेल एक्सचेंज सोल्युशन या कंपनीसाठी जीत एक्सपोर्टस या फर्मच्या माध्यमातून केलेल्या इंजिनिअरिंग व ॲब्रीकेशनचे कामाचा मोबदला न दिल्याने फसवणूकीचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल केला आहे.
नुरीयल पेंझरकर, श्रेता नेगी, सुमेध बापट (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र विठ्ठल तानवडे (वय ४४, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी नोबेल एक्सचेंज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीसाठी तानवडे यांनी जीत एक्सपोर्टस या फर्मच्या मध्यमाताून ६३ लाख २६ हजार ४७५ रुपयांचे काम केले होते. त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना आजअखेर १६ लाख ९७ हजार ६९ रुपये दिले आहेत. केलेल्या कामापैकी ४६ लाख २९ हजार ४०९ रुपये तसेच नोबेल एक्सचेंज सोल्युशन एलएलपी यांच्याकडून पाषाण -सुस रोड येथील प्लॉटच्या केलेल्या ॲब्रीकेशनच्या कामाचे ६१ हजार ४६३ रुपये वेळोवेळी मागणी करुन दिले नाहीत. कंपनीला या प्लॉटमधून उत्पन्न् येत असतानाही न देता ते पैसे कंपनीच्या फायद्यासाठी स्वखर्चासाठी वापरुन फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.