गंगाधर दगडू गोरे असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात मंचर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील अधिकारी मनीषा हरिभाऊ नाईकनवरे यांनी तक्रार दिली आहे. सावकाराचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक सरकारी संस्था मंचर येथील कार्यालयात दि. 22 जून रोजी सुरेश जयवंत मांदळे ( रा.अवसरी बुद्रुक) व अशोक हृदयनारायण तिवारी (रा.नारायणगाव, ता.जुन्नर) या दोघांनी सावकार गंगाधर दगडू गोरे (रा.अवसरी बुद्रुक) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी करत असल्याचा तक्रारी अर्ज केला होता. त्यानुसार मंचर पोलिसांबरोबर पत्र व्यवहार करण्यात आला. यातील सावकार गंगाधर दगडू गोरे यांच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्त घेऊन छापा टाकण्यात आला. सावकाराचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक अधिकारी पी.एस.रोकडे, सहाय्यक सरकारी अधिकारी एस.जी. लादे, एस.एस.चौधरी, दोन पंच यांनी गोरे याच्या घरी धाड मारून घराची झडती घेतली. त्यावेळी गोरे यांच्याकडे कोरे सहीचे चेक, कोऱ्या सह्याचे स्टॅम्प पेपर, रजिस्टर, सहीचे रेव्हन्यू स्टॅम्प इत्यादी संशयास्पद कागदपत्रे मिळून आली आहेत. यावरून गंगाधर गोरे हे अवैध सावकारी व्यवसाय करून अर्जदार यांच्याकडून व्याजाची आकारणी करून गरजू व्यक्तीची आर्थिक पिळवणूक करत असल्याची खात्री झाल्याने गोरे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश डावखर करत आहे.