भरत यशवंत राठोड (रा. पाळद, जि. धुळे), अजय वाल्मीक सोनवणे, रोहिदास रघुनाथ, आगे दीपक सूर्यभान पवार, तुकाराम जगन्नाथ सोनवणे, मनिराम सोनू सोनवणे, प्रकाश यशवंत पाटील या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद किशोर सखाराम गाडगे (रा. कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिली आहे.
ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर गाडगे तसेच त्यांचे इतर सहकारी यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोड टोळ्या (लेबर) मिळणे वरील ठेकेदारांकडे नोटरी करार केले व करारापोटी त्यांना सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम अदा केली होती. परंतु करारानुसार ऊसतोड मजूर न देता किशोर गाडगे तसेच त्यांचे इतर सहकारी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सात जणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास डाॅ. अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे हे करीत आहे.