मंगलकार्याचे मालक शैलेश गणपत ढमाले ( रा. ढमाले मळा, ओतूर), कार्यमालक -भगवान विठ्ठल फळसकर ( रा.दिवा, जि.ठाणे) व शेखर शांताराम बेनके ( रा. लालखन हिवरे. ता. जुन्नर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नगर-कल्याण महामार्गावर ओतूर जवळ शुभश्री लॉन्स मंगल कार्यालय आहे, येथे १९ मार्च रोजी एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यात शासनाच्या नियमांची पायमल्ली केली. मात्र, पन्नास पेक्षा अधिक व्यक्ती विवाहसोहळ्यात जमले, शिवाय अनेकांनी अनेकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते. याशिवाय फिजिकल डिस्टंन्सिंगचाही नियम पायदळी तुडवला त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
ओतूर शहर आणि परिसरात मास्क न वापरता वाहन चालविणे रस्त्याने बाजारात हिंडणे मास्क न वापरता चालणे-फिरणे या कारणास्तव केवळ या मार्च महिन्यात परिसर व शहरात ओतूर पोलिसांचे फिरते पथक नियुक्त केले आहे या मार्च महिन्यात मास्क न वापरणारे ,यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आजपर्यंत १ लाख २५हजार रुपये दंड ओतूर पोलीस पथकाने वसूल केला आहे अशी माहिती ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
--
चौकट
हॉटेलचालकावरही गुन्हा दाखल
नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर बसस्थानकाजवळ हॉटेल अमृततुल्यमध्ये रात्री ११ नंतर हॉटेल सुरू ठेवले होते तोंडावर मास्क लावले नव्हते, तेव्हा हाॅटेलचालक महेश सुहास जगताप ( रा. ओतूर, पाटीलआळी, ओतूर )यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे .