शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
2
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
3
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
4
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
5
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
6
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
7
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
8
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
9
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
10
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
11
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
12
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
13
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
14
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
15
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
16
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
17
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
18
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
19
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
20
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार चित्रपट महोत्सव..! कुठल्याही वेळेत पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:37 IST

बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे.

- श्रीकिशन काळे पुणे : चित्रपटगृहामध्ये चांगल्या मराठी सिनेमाला जागा मिळत नसल्याने ते प्रदर्शित करता येत नव्हते, त्यामुळे आता नाट्यगृहांमध्ये सिनेमा दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला आहे. पुण्यातच प्रथम हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे. त्यात अनेक चांगले चित्रपट पाहता येणार आहेत.

मराठी चित्रपट निमात्यांच्या व कलाकारांच्या समस्या निवारण,तसेच व्यासपीठ निर्मिती आणि सर्वोतोपरी मदत, या बहुउद्देशीय संकल्पनेतून “मराठी चित्रपट असोसिएशन”ची उभारणी करण्यात आली. त्यातंर्गत हा महोत्सव आयोजिला आहे. एकीकडे मराठी चित्रपटांना पडदा मिळत नाही, तर दुसरीकडे नाटकांचे प्रयोग सतत होताना दिसत नाहीत,नाट्यगृह नेहमीच रिकामी राहतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रात तसेच पुण्यात नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही चित्रपटांचे खेळही आम्ही पार पाडले आणि रसिकांचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला.

या महोत्सवाच्या निमित्त आपल्या मराठी प्रेक्षकांना नाट्यगृहांमध्ये चित्रपट पाहण्याची एक सवय व्हावी आणि नाट्यगृहात अगदी मल्टिप्लेक्स प्रमाणेच चांगल्या उत्तम स्क्रीनवर आणि दर्जेदार साऊंड सिस्टिम मध्ये आपला मराठी चित्रपट हा पाहता येऊ शकतो एवढेच उद्दिष्ट या मराठी चित्रपट महोत्सव च्या निमित्त आम्ही केले आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. 

या महोत्सवामध्ये आम्ही नुकतेच प्रदर्शित झालेले मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, पाणीपुरी, हॅशटॅग तदेव लग्नम, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, अल्याड पल्याड, श्री गणेशा हे चित्रपट ४९ रुपयात आम्ही दाखविणार आहोत. ही रक्कम अगदी सहजपणे सर्वसामान्य कुटुंबाला देखील परवडेल अशी आहे, अशी माहिती मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

मराठी चित्रपट असोसिएशन तर्फे दिनांक २२ आणि २३ जानेवारी २०२५ ला बालगंधर्व रंगमंदिरपुणे येथे मराठी चित्रपट महोत्सव होत आहे. मराठी प्रेक्षकांना मल्टिप्लेक्स पेक्षा कमी दरामध्ये आपला मराठी चित्रपट हा पाहता येऊ शकतो, त्याचबरोबर मॉर्निंग असो, दुपारी असो, किंवा प्राईम टाईम असो अशा कुठल्याही वेळेत आणि अल्प दरात तो पाहता येऊ शकतो यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. - कौस्तुभ कुलकर्णी (सरचिटणीस, मराठी चित्रपट असोसिएशन)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरmarathiमराठीMarathi Actorमराठी अभिनेता