लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे फाल्कन्स आणि कर्नाटक स्पोर्ट्स संघांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोन्ही संघांतील चुरशीचा सामना उद्या रंगणार आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोटर््स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित ही स्पर्धा व्ही.एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ‘ब’ गटातील पहिल्या लढतीत पुणे फाल्कन्स संघाने विमेन स्पोटर््स असोसिएशन (डब्ल्यूएसए) संघावर ३ विकेटने मात केली. डब्ल्यूएसए संघाने २० षटकांत २ बाद ११६ धावा केल्या तर पुणे फाल्कन्स संघाने २० षटकांत ७ बाद ११७ धाव करून विजय मिळविला. लक्ष्याचा पाठलाग करताना फाल्कन्सच्या केतकी खांडेकरने ३९ चेंडंूत २८ धावा तर पूनम जगतापने ३२ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. माधुरी अगव हिनेदेखील १९ चेंडूंमध्ये २४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. केतकी खांडेकरला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याआधी डब्ल्यूएसए संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाज मुक्ता मगरेने ५२ चेंडूंत ४९ धावा, तर प्रियंका घोडकेने ४२ चेंडूंत ३५ धावा केल्या. चार्मी गवईने नाबाद १५ धावांची खेळी केली. फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला तरी डब्ल्यूएसए संघाच्या गोलंदाजांनी निराशा केली. दुसऱ्या लढतीत कर्नाटक स्पोटर््स संघाने सेंट्रल रेल्वे संघावर ४ विकेटनी मात केली. सेंट्रल रेल्वेच्या संघाने २० षटकांत ९ बाद ९३ धावा केल्या तर कर्नाटक स्पोटर््स संघाने १८.३ षटकांत ६ बाद ९७ धावा करीत विजय मिळविला.
पुणे फाल्कन्स- कर्नाटक यांच्यात अंंतिम लढत
By admin | Published: May 13, 2017 4:48 AM