देऊळगावराजे : दौंड शुगरने शेतकऱ्यांच्या उसाला अंतिम पेमेंट १३१.७३ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर कारखान्याकडून यापूर्वी २000 रुपये भाव देण्यात आले. आता त्यामध्ये १३१.७३ रूपये प्रतिटनाला वाढ करण्यात आली असून, त्यानुसार गाळप हंगाम २०१४-१५मध्ये गाळप केलेल्या उसाला शासनाच्या आदेशानुसार २१३१.७३ अंतिम दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.७० मिळालेला आहे. एफआरपी रुपये १३१,७३ प्रति मेट्रिक टनाप्रमाणे पेमेंट अदा करण्यासाठी कारखान्यास सॉफ्टलोन १५ अंतर्गत जिल्हा पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेने रुपये १३.८९ कोटी अर्ज मंजूर केलेले आहे. कारखान्याचा गाळप हंगाम २०१५-१६ सुरू करण्यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून लेबर भरती, मशिनरी दुरुस्ती इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. १५ आॅक्टोबर २०१५ पासून गाळप हंगाम सुरू करणार आहे. जास्तीत जास्त शेकऱ्यांनी ऊस दौंड शुगरला गाळपास आणावा, असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.
दौंड शुगरचे अंतिम पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
By admin | Published: October 01, 2015 12:58 AM