राहूबेट परिसर ऊस पिकाचे आगर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी प्रमाणे एप्रिल-मे महिन्यात शेतीच्या मशागतीची फार मोठी लगबग चालू आहे. परिसरातील अनेक कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नसून पहिल्यापासूनच कमी प्रमाणात बाजार दिले असून तसेच अंतिम हप्ता जमा न करण्यात आल्याने शेतकरी उसनवारी करून ही कामे करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी शेणखत उपलब्ध नाही अशा ठिकाणचे शेतकरी शेणखत विकत घेताना दिसत आहे. परंतु यासाठी देखील साडेतीन ते चार हजार पाचशे रुपयांना एक ट्रेलरप्रमाणे शेणखत विकत घ्यावे लागत आहे. शेतकरी वर्गावर आज उत्पादन खर्च ज्यादा करण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत मिळणारे बाजारभाव पैसे कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यातच मजुरांअभावी अनेक ठिकाणी घरगुती कामे उरकण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. उत्पादन खर्च ज्यादा व तुलनेत मिळणारे पैसे कमी आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या उत्पादनातून चार पैसे ज्यादा वाढीव दराची अपेक्षा करत आहे.
शेतीच्या मशागतीचे भाव गगनाला
राहूबेटात यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागती केल्या जातात. सध्या तरी डिझेलचे बाजारभाव वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. तीन हजार पाचशे रुपये एकर नांगरट, तीन हजार रुपये रोटावेटरसाठी, सोळाशे रुपये एकर कांकरणी, पट्टा काढणे दोन हजार रुपये, शेणखत चार हजार रुपये ट्रेलर असे दर आहेत. या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
२६ पाटेठाण
राहूबेट (ता. दौंड) परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या पावसाळापूर्व मशागतींना वेग आला आहे.
===Photopath===
260521\26pun_2_26052021_6.jpg
===Caption===
२६ पाटेठाणराहूबेट (ता. दौंड) परीसरात ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या पावसाळ्या पूर्व मशागतींना वेग आला आहे.