पुणे : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवथ (डीपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सतरा सदस्यांच्या नेमणुका नियोजन विभागाने केले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नियोजन विभागाने नव्याने या नियुक्त्या केल्या आहेत.
विधीमंडळ आणि संसदेत सदस्यांमधून नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार संजय जगताप यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये पुरंदर तालुक्यातील माणिकराव झेंडे, भोर तालुक्यातील विक्रम काशिनाथ खुटवड, मुळशी तालुक्यातील अमित खंदारे आणि लोणी काळभोरमधील संतोष कांचन यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये माणिक निंबाळकर (एकतपुर, पुरंदर), शरद गणपत हुलावळे (कार्ला, मावळ), ज्ञानेश्वर रावजी खंडागळे (मांजरवाडी, जुन्नर), रामकृष्ण सातव पाटील (वाघोली), सत्वशील मधुकर शितोळे (पाटस, दौंड), निवृत्ती ज्ञानोबा बांदल (उंड्री, हवेली), कैलास बबनराव सांडभोर (राजगुरुनगर), विठ्ठल दगडू शिंदे (इंदोरी), विकास बळीराम दरेकर (गुंजाळवाडी, जुन्नर), पंडित गेनभाऊ दरेकर (सणसवाडी, शिरूर), सचिन अशोकराव सपकाळ (सपकाळवाडी, इंदापूर) यांचा यामध्ये समावेश आहे.