नारायणगाव बसस्थानकाच्या रखडलेल्या इमारतीच्या नूतनीकरणसंदर्भात वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने मनसे स्टाइलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी दिला होता. त्यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम ठेकेदार श्रीकांत बर्गे यांनी आज नारायणगाव बसस्थानक येथे आपल्या बांधकाम टीमसह उपस्थित राहून मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे व तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी योगेश तोडकर, दत्ता वऱ्हाडी, अवधूत अष्टेकर, दीपक गुंजाळ, नवनाथ वाळूंज, महेंद्र फापाळे, रोहिदास चाळक, श्रीराम डोके, संपत खरडे, धनेश तळपे, दीप जाधव, अनिल देशपांडे, जितेंद्र बाळसराफ, मनीष खंडागळे, मयूर वाळूंज, नयन दाभाडे आदी उपस्थित होते.
या वेळी बांधकाम ठिकाणी लावलेले पत्रे काढून प्रवाशांना जादा मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, बांधकाम ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करावा, लगतचा परिसर स्वच्छ करावा, शौचालयाकडे जाण्यासाठी फलक लावावा, बांधकाम ठिकाणी लावलेल्या पत्र्यांना कलर करावा आदी मागण्यांनाही प्रतिसाद देण्यात आला.
---
फोटो क्रमांक : २०
फोटो ओळ : नारायणगाव एसटी स्टॅन्डच्या रखडलेल्या कामाला आज प्रारंभ करण्यात आला. या वेळी कामाची पाहणी करताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे व बांधकाम ठेकेदार श्रीकांत बर्गे.
200821\img_20210820_120339.jpg
नारायणगाव एस टी स्टॅन्डचे रखडलेल्या कामाला आज प्रारभ करण्यात आला , यावेळी कामाची पाहणी करताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे , तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे व बांधकाम ठेकेदार श्रीकांत बर्गे.