अखेर चर्चेला पूर्णविराम! लोणी काळभोर अन् उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर दलात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:41 PM2021-03-23T17:41:18+5:302021-03-23T17:41:43+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी आग्रही असताना मात्र या ठाण्याच्या निर्मितीला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Finally end the discussion! Loni Kalbhor and Uruli Kanchan police stations included in Pune city force | अखेर चर्चेला पूर्णविराम! लोणी काळभोर अन् उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर दलात समावेश

अखेर चर्चेला पूर्णविराम! लोणी काळभोर अन् उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर दलात समावेश

googlenewsNext

लोणी काळभोर : गेले दोन ते अडीच वर्षांपासून पुणे शहर दलात समाविष्ट होणार म्हणून चर्चेत आलेले लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन पोलीस ठाणी अखेर सोमवारी (दि. २२ ) रोजी मध्यरात्रीपासुन पुणे शहर आयुक्तालयाशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळेे या चर्चेेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 

 पुणे शहर आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून लोणी काळभोर व लोणी कंद या दोन्ही पोलीस ठाण्यांचा कारभार हाती घेतला,अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे. 


जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असणारी लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश होणार असल्याच्या चर्चा गेले दोन ते अडीच वर्षापासून रंगत होत्या. परंतू, पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय प्रतिनिधींकडूनही तारखेवर तारखा मिळत असल्यामुळे पोलीस खात्याबरोबरच, सर्वसामान्य नागरिकांचेही दोन्ही पोलीस ठाण्यांच्या शहर पोलिसांत होणाऱ्या समावेशाकडे लक्ष लागलेले होते. अखेर सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यासाठी मुहुर्त मिळाला. 

       
राज्य सरकारने मंगळवारी ( १६ मार्च ) रोजी या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समावेशासाठी लेखी स्वरुपात परवानगी दिली होती. यामुळे १८ मार्चपुर्वीच लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाणे यांचा ताबा शहर पोलिसांच्या कडे जाणार होता. परंतू  काही शासकीय कामकाजामुळे दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी विलंब लागला. 

लोणी काळभोर पोलीस ठाणे शहर पोलिसांत समावेश होणार असल्याच्या चर्चेबरोबरच उरुळी कांचन व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होणार असल्याची चर्चाही रंगली होती. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही वाघोली व उरुळी कांचनसाठी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी व्हावी यासाठी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठकही झाली होती. मात्र, सोमवारी रात्री लोणी काळभोर बरोबरच उरुळी कांचनचाही समावेश शहर पोलिसात केला गेला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी आग्रही असताना मात्र या ठाण्याच्या निर्मितीला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पुणे शहर पोलीस पथकाने हाती घेतला आहे. यामुळे अधिकृतरित्या या पोलीस ठाण्याचा समावेश शहर पोलिस दलात  झाला आहे.

Web Title: Finally end the discussion! Loni Kalbhor and Uruli Kanchan police stations included in Pune city force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.