सिंहगड रस्त्यावरच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूलचा कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.पुणे महापालिकेचा स्थायी समितीने या उड्डाण पुलाचा कामासाठी १३५ कोटींची आर्थिक तरतूद करायला मंजुरी दिली आहे. आता प्रत्यक्षात निविदा निघून हे काम कधी सुरू होणार हे मात्र पाहावं लागणार आहे.
सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे महापालिकेने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. २०१८-१९ मध्ये महापालिकेने यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर महापालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या सल्लगरकडून प्राप्त झालेल्या ४ पर्यायांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे सूचावण्यात आले होते. यापैकी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंत बांधला जाणार आहे.
या कामासाठी १९-२० मध्ये ३० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.पण लॉकडाऊन मुळे या प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.यासाठी लागणारी १३५ कोटींची तरतूद टप्प्या टप्प्याने उपलब्ध करायला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.