शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 5:44 PM

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकली; पालकमंत्र्यांची झाली कोंडी

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरुन मंजुर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा मागील आठ दिवसांपासून प्रलंबित असलेला आदेशच अखेर रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयाने सोलापुरचेच पालकमंत्री व इंदापुर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या दत्तात्रय भरणे यांची मोठी कोंडी झाली आहे. अवर्षणप्रवण भागाला या निर्णयामुळे पाण्यासाठी उपेक्षाच करावी लागणार आहे.

आज जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी हा आदेश दिला आहे.त्यानुसार  उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्याबाबतचा शासनाचा २२ एप्रिल २०२१ रोजी व समकक्ष असणारे आदेशच रद्द केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आमदार संजय शिंदे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. भीमा नदीवरील उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा मोठा त्याग आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरुन राजकारण तापत होते. त्यामुळे मागील ३० वर्षांपासून धगधगणाºया खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व  निरा डावा  कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनला मंजुरी मिळाल्यामुळे सुटणार, अशी अपेक्षा शेतकऱ्याांची होती.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी या योजनेला कडाडुन विरोध करत  आदेश करण्यास भाग पाडले. याचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. खडकवासला कालव्यावरील  सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते.

इंदापुर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या  पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबुन आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर आहे. नविन उपसा सिंचनमुळे  शेटफळगढे पासून बेडशिंगे पर्यंत सुमारे ३६ गावामधील  क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार होते.

तसेच खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र अंथुर्णे पासुन पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा सुरू होता. खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने सणसर जोड बोगद्यालाही पाणी दिले जात नव्हते. आता या गावांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरSolapurसोलापूरState Governmentराज्य सरकारWaterपाणीUjine Damउजनी धरण