शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

अखेर ‘स्वाभिमानी’ सत्तेतून बाहेर, मुख्यमंत्र्यांना ४ सप्टेंबरला देणार लेखी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 3:08 AM

केंद्र व राज्यातील सत्तेमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : केंद्र व राज्यातील सत्तेमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांनी बुधवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्यास एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह सत्तेतील पदांवर असणारे कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. देशातील व राज्यातील अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र, शेतकºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडत आहे. ४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे लेखी पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सत्तेतून बाहेर पडल्याने बीजेपीला फरक पडणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक आहे.- शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकºयांची चळवळ उभी केली जात आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून या मोहिमेच्या दुसºया टप्प्यास सुरुवात केली जाईल. या अंतर्गत तेलंगणा, आंध्र प्रदेश,कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यातील शेतकºयांशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतर येथे देशभरातील १० लाख शेतकºयांचा मोर्चा काढला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.केंद्रेकरांची बदली का केली?राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरूवात केली, त्यामुळेच त्यांची बदली झाली, याबाबतचे पुरावे असल्यामुळेच हा प्रश्न विचारणार असल्याचे शेट्टी म्हणाले.शरद पवारांनी उडविली खिल्लीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यावर ‘फक्त एकानेच पाठिंबा काढून घेतला का?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बारामतीमध्ये शेट्टी यांच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत मंत्रिपदाला चिकटून राहिले आहेत. तसेच पाठिंबा काढून घेतल्याचा काही परिणाम जाणवणार नाही, असेही पवार म्हणाले.जिल्हा परिषदेत भाजपाबरोबर सत्तेतचकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते भाजपाबरोबर कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे.जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. त्यात ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात एकाकडे सभापतिपदही आहे. पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे. जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी