लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने एक महिन्यापूर्वी राज्यातील 15 तहसिलदारांना पदोन्नती जाहिर केली होती, पण अद्याप पोस्टींग मात्र दिले नव्हते. अखेर शासनाने गुरूवार (दि.19) रोजी रात्री उशीरा सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या अधिका-यांना पोस्टींग देण्यात आली. यामध्ये पुण्याती तीन उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला तहसिलदारांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, पहिल्या टप्प्यात 15 तहसिलदारांना पदोन्नती देण्यात आली. राज्यात पोलिस, ग्राम विकास विभागाच्या तुलनेत महसूल विभागातील अधिका-यांना खूपच उशीरा पदोन्नत्या दिल्या जातात. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून यात बद्दल झाला असून, महसूल विभागाच्या पदोन्नतीच्या फाईल मंजूर होऊ लागल्या अहेत. शासनाने राज्यातील तहसिलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती दिली. त्यानुसार काही दिवसांत या सर्वांना पोस्टींग देण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. यामध्ये पुणे शहर तहसिलदार कार्यालयातील रोहिणे आखाडे यांना पुणे जिल्हाधिकिरी कार्यालयात भूसंपादन अकिकारी 4 पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर अप्पासाहेब समिंदर यांना अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर पदी व भगवान कांबळे यांना उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारो , कोल्हापूर येथे पोस्टींग देण्यात आले.