शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अखेर ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल; दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:17 AM

पुणे : शहरी भागासोबतच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध देखील (दि. १६) पासून शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण ...

पुणे : शहरी भागासोबतच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध देखील (दि. १६) पासून शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद आणि हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत.

राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेले आदेश आणि नियमावली, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ग्रामीण क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल केल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यांपासून ५ टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोना बाधित दर ४.९ टक्क्यांवर आल्याने निर्बंधातून सूट मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर ग्रामीण भागाला हा दिलासा मिळाला आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मॉलसाठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच राज्य शासनाने लागू केलेले कोरोनाविषयक सर्व नियम लागू राहणार आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व हॉटेल, बार ५० टक्के क्षमतेसह सर्व रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री ९ पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. हे करत असताना कोरोना विषय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी दुकानदार आणि हॉटेल मालकांवर देण्यात आली आहे.