शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:00 PM

पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळला

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे :  बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या बाऊंड्रीवर खाजगी विमानतळ उभारण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे साडेतीन हजार एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने  मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. औद्योगिक महामंडळाच्या प्रस्तावाला नुकतेच दिल्लीच्या हाय पाॅवर कमिटीने मंजुरी दिली आहे. बारामती तालुक्यातील अदानी ग्रुपच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब झाल्यानेच पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उड्डाण जवळजवळ निश्चित झाले असताना राज्य शासनाने पाठवलेल्या नवीन जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द करत मोठा धक्का दिला होता. परंतु यामागची खरी वस्तुस्थिती बारामती तालुक्यातील अदानींचे खाजगी विमानतळ हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा परवाना राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रद्द केला. त्यामुळे विमानतळ जुन्या जागेत होणार का आणि त्याला परवानगी मिळणार का हा विषय चर्चेत असतानाच आता अदानी समूहाकडून या प्रस्तावित विमानतळाच्या लगत किंबहुना विमानतळाच्या क्षेत्रात जाणाऱ्या काही गावांमध्ये देखील मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

या मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्कसाठी पुरंदर तालुक्यातील राजुरी, पिसे, नायगाव आणि पिंपरी  बारामती तालुक्यातील आंबी, भोंडवे वाडी आणि चांदगुडे वाडी तर दौंड तालुक्यातील खोर या आठ गावांमधील साडे तीन हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे. औद्योगिक महामंडळाने या जागेचे सर्वेक्षण करून मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्क च्या आराखडयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला नुकतेच दिल्ली हाय पाॅवर कमिटीने तत्वतः मजूरी दिली असल्याची माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. यासाठी काही आवश्यक एनओसी मिळाल्यानंतर एमआयडीसीकडून अदानींच्या खाजगी मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कसाठीचे नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. या लॉजिस्टिक पार्कमध्ये खार्गो हबसह विमानतळ उभारणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :pune airportपुणे विमानतळairplaneविमानAdaniअदानीCentral Governmentकेंद्र सरकार