कोंढवा: गेल्या वर्षी ११ जून रोजी ही जागा दफनभूमीसाठी महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. गेल्यावर्षी 12 जून रोजी पहिला मृतदेह त्या जागेवर दफन करण्यात आला होता. तेव्हापासून तर आज रोजी पर्यंत साधारण साडेतीनशे पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांचे त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले. त्यामुळे ही जागा पूर्णपणे भरून गेल्याने कोंढवा भागातील स्थानिक मुस्लिम रहिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत होते.मात्र आता महापालिकेकडून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.
कोंढवा येथील राहत बाग कब्रस्तानचे मुख्य ट्रस्टी शफी पठाण हे शेजारी असलेल्या जागेसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन शेजारी असलेली जागा कब्रस्तानसाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. स्थायी समिती सदस्य व नगरसेविका नंदा लोणकर यांच्या पुढाकारातून सर्व्हे क्रमांक १३ ची जागा तातडीने राहत बाग येथील मुस्लिम दफनभूमीसाठी उपलब्ध करून झाली आहे.
तीन लाख लोकसंख्या असलेल्या कोंढवा भागातील मुस्लिमांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याठिकाणी मंगळवारी (दि. १३) रोजी नगरसेविका नंदा लोणकर यांच्या उपस्थितीत शफी पठाण, हाजी नजीर भाई शेख, मौलाना कादरी, अंजुम ईनामदार, मोहम्मदिन खान, गाजे खान, झहीर शेख, युवराज लोणकर, याकुब शेख, समीर पठाण, समीर शेख, नईम शेख यांच्या उपस्थितीत दफन विधी भूमीपूजन व मौलाना इस्तयाक कादरी यांचे हस्ते दुवा करण्यात आली.