नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी मौजे मांडवगण फराटा येथील जमीन गट नं. २५६/१ व २५६/२ अनुषंगाने हद्दीबाबत मोजणीमध्ये त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्याची अंमलबजावणी पोलिसांमार्फत करणेकरिता खोटा, बनावट आदेश तयार करुन मोजणी खातेदारांशी संगनमत करून अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होती. त्यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करणे, बनावट खोटे आदेश पारीत करणे, नियमबाह्य पद्धतीने कृती करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, कागदपत्रांच्या प्रती गायब करणे आदी अनियमितता केल्याचे निदर्शनात आले. या अनुषंगाने त्यांची निलंबनांतर विभागीय चौकशीसुद्धा होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून यादव यांना ६/७/२०२१ पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी सचिन गोरख जाधव (मुंबईकर) व इतर यांनी केलेला योग्य पाठपुरावा करुन गोळा केलेली कागदपत्रे आणि केलेल्या उपोषणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून अत्यंत कमी वेळेत याचा निकाल लावल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी सचिन गोरख जाधव (मुंबईकर) यांनी केले
शिरुर तालुक्यात प्रथमच नायब तहसीलदार पदावरील व्यक्तीला निलंबित केल्यामुळे सध्या इतर कामचुकार अधिकाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.