शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम
2
'वंदे भारत' मेट्रोचं नाव बदललं, आता 'नमो भारत रॅपिड रेल' नावानं ओळखली जाणार, रेल्वेचा मोठा निर्णय
3
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…
4
बाबो! टेस्लाच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी लागले १.९० लाख लीटर पाणी; उष्णता, धूर एवढा की... 
5
मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन
6
Blinkit, Zepto वरुन खरेदी करणाऱ्यांवर सरकारची नजर! मागितला जाऊ शकतो डेटा, कारण काय?
7
राजकीय निवृत्तीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..." 
8
'अशी ही बनवाबनवी'मधील ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना, सचिन पिळगावकरांचा खुलासा
9
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत
10
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खलिस्तानला पाठिंबा मिळेल, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा दावा 
11
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
12
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार
13
चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  
14
Ganesh Visarjan 2024: बाप्पाला निरोप देताना 'हे' गणेश मंत्र म्हणायला विसरू नका; पूजेला येईल पूर्णत्त्व!
15
एक मॅच, एक दिवस अन् १ वर्ष किती कमावतात क्रिकेट कॉमेंटेटर? आकाश चोपडांचा खुलासा
16
Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश
17
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?
18
Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 
20
अनन्या पांडेने वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली - "मी एक..."

...अखेर रिंगरोडसाठी मावळ तालुक्यातील पाच गावांचा दर झाला निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 9:22 PM

पुढील पंधरा दिवसांत पहिले खरेदी खत होण्याची शक्यता

पुणे : पुणे शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणा-या रिंगरोडसाठी अखेर मावळ तालुक्यातील पाच गावांसाठी दर निश्चित झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवार (दि.3) रोजी पहिली बैठक पार पडली. यामुळे पुढील पंधरा दिवसांत रिंगरोडसाठी पहिले खरेदी खत देखील होण्याची शक्यता व्यक्त केली. स्वच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या तब्बल पाचपट मोबदला दिला जाणार आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम भागातील रिंगरोडसाठीची जमिन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर दर निश्चिती केली जाते. दर निश्चिती करताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रचंड खबरदारी घेतली असून,  सर्व तांत्रिक गोष्टी बारकाईन तपासणी करून घेण्यात आली. समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी तीन दिवसांची समृद्धी महामार्गासाठी काम केलेल्या काही प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी पुण्यात येऊन कार्यशाळा घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से या पाच गावांचे दर निश्चित झाले आहेत. आता पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खरेदी खत करण्यास सुरुवात देखील होईल.

असा होणार रिंगरोड 

भोर : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे हवेली : रहाटावडे, कल्याण, चेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली. मुळशी : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी. मावळ :  पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से 

टॅग्स :mavalमावळFarmerशेतकरीGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी