पुणे : राज्य समाईक परीक्षा कक्ष सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी पीसीएम- पीसीबी २०२४ चा निकाल केव्हा जाहीर हाेणार ? यासाठी गत एक आठवड्यापासून उमेदवार आणि पालक वाट पाहत हाेते. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून सीईटी सेल तर्फे रविवार दि. १६ जून राेजी सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारांना cetcell.mahacet.org/ आणि portal.maharashtracet.org/ या संकेतस्थळावर सहा नंतर निकाल पाहता येणार आहे. एमएचटी सीईटी निकालानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. गतवर्षी पीसीएम ग्रुप मधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुप मध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले हाेते. तसेच पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमधील प्रत्येकी ७ असे एकुण १४ उमेदवारांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले हाेते.
असा पाहता येईल निकाल
- सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट द्या.- संकेतस्थळावरील एमएचटी सीईटी निकालाच्या लिंकवर जा.- परीक्षा क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पीन टाका- निकाल पाहून निकालाची प्रत डाउनलोड करा.