पुणे: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पुणेकरांना प्रतिक्षाच करायला लावली आहे. अद्याप जोरदार पाऊस झाला नाही. परंतु, सोमवारपासून मॉन्सून सक्रिय होणार असून, या आठवड्यात चांगला पाऊस होणार आहे. तसेच यलो अलर्टही जारी केला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
येत्या ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कोकणाला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात पुढील ५ दिवस विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्याचे हवामान विभगाचे प्रमुख, कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार पुढील ४ ते ५ दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधारचा अंदाज आहे.
इथे दिला यलो, ऑरेंज अलर्ट
कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट व जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र यलो अलर्ट दिला आहे. तसेच मंगळवारी पुण्यात आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल.
शहरातील सोमवारचा पाऊस
शिवाजीनगर : १.७ मिमीपाषाण : २.४ मिमीलोहगाव : २.६ मिमीचिंचवड : २.५ मिमीलवळे : २.० मिमी