शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शासकीय कार्यालयात आर्थिक शोषण नित्याचे

By admin | Published: June 17, 2015 12:54 AM

तालुक्यातील शासकीय कार्यालये सर्वसामान्यांसाठी ‘शोषण कार्यालये’ बनू लागल्याचे वास्तव आहे. मजबुरीमुळे ग्राहक याला बळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रवीण गायकवाड, शिरूरतालुक्यातील शासकीय कार्यालये सर्वसामान्यांसाठी ‘शोषण कार्यालये’ बनू लागल्याचे वास्तव आहे. मजबुरीमुळे ग्राहक याला बळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.१०वी-बारावीचे निकाल लागले, की वय, अधिवास, नॉन-क्रिमीलेयर तसेच जातीच्या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना तलाठी कार्यालयाची पायरी चढावी लागते. या कार्यालयाचा हा जणू व्यवसायाचा सीझन असल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून या दाखल्यांसाठी पैसे उकळले जातात. येथील तलाठी कार्यालयात हा प्रकार आढळून आला. प्रवेशासाठी हे दाखले आवश्यक असतात. प्रवेशास उशीर होऊ नये म्हणून तत्काळ दाखले मिळावेत, यासाठी विद्यार्थी आग्रही असतात. याचाच गैरफायदा तलाठी कार्यालयात घेतला जात आहे. दाखल्यांसाठी जे काही प्रतिज्ञापत्र लागते, ते साध्या कागदावर केले तरी चालते. ग्रामीण भागातील लोकांना हे माहीत नसल्याने बऱ्याचदा ते स्टॅम्प-व्हेंडरकडे ते जातात. तिथेही त्यांची लूट होते. नकाशा नकला घेण्यासाठी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे सैनिक निधी म्हणून जादा पैशांची मागणी केली जाते. सैनिक निधी हा ऐच्छिक असावा; मात्र या कार्यालयातील संबंधित कर्मचारी १०० ते ३०० रुपयांची मागणी करतो. निधी नाही दिला, तर काम करीत नाही. चलन भिरकावून देतो. आज मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर नकाशा (जागेचा) काढण्यासाठी या कार्यालयात गेले असता, त्यांच्याकडे १०० रुपयांची मागणी करण्यात आली. सैनिक निधी एवढा आणि जबरदस्ती का, असा प्रश्न कडेकर यांनी विचारला. यावर कर्मचाऱ्याने कडेकर यांच्याशी हुज्जत घातली. मनसे पदाधिकारी असल्याचे कळाल्यावर कर्मचारी जागेवर आला.भूमी-अभिलेख कार्यालयाला नेमके कोणाचे अभय आहे, हेच कळत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची, हा प्रश्न आहे. पंयाचत समितीमध्ये जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात. यात अनेक योजनांमध्ये सबसिडी असते. या योजनांच्या लाभार्थ्यांना टेबलावर वजन ठेवल्याशिवाय योजनांचा लाभ घेता येत नाही. तीन ते चार वर्षांपूर्वी मोफत सौरकंदील वाटप योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये घेण्यात आले होते. ‘लोकमत’नेच ही बाब उघड केली होती. कृषी विभागात लाभार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेविषयीदेखील ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. या गोष्टींना आळा बसला; मात्र हे प्रकार पूर्ण बंद होताना दिसत नाहीत. ज्या काही या योजना असतात, त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी असतात. अशा घटकांकडूनही पैसे उकळणे म्हणजे दिव्यच प्रकार म्हणावा लागेल. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी स्थापन झालेली शासकीय कार्यालये ही सर्वसामान्यांची लूट करणारी कार्यालये बनू लागली असून, प्रशासकीय व्यवस्था जोपर्यंत कडक होत नाही, तोपर्यंत हे प्रकार कोणीच थांबवू शकणार नाही एवढे मात्र नक्की.