याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. व्ही.डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच.एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, क्रीडाशिक्षक प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. तानाजी पिंगळे, प्रा. सारिका गोरे आदींची उपस्थिती होती.
संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी सारिका शिनगारे व वैष्णव ठाकूर यांची पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिराकरिता निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून कॉमनवेल्थ स्पर्धेकरिता भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कायम गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. या विद्यार्थ्यांची कामगिरी अभिमानास्पद असून, पालकांनी या खेळाडूंना मानसिक पाठबळ, तर समाजाने आर्थिक पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली. संस्था म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
शहाजी ठाकूर, मंगेश शिनगारे या पालकांनी संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. प्रतिमा लोणारी यांनी केले, तर आभार प्रा. तानाजी पिंगळे यांनी मानले.
--
१७ राजगुरू नगर : धनादेश खेळाडू
फोटो ओळी : ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते धनादेश स्वीकारताना पालक शहाजी ठाकूर, मंगेश शिनगारे.