शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रश्नांची उत्तरे शोधा; व्यवसाय सापडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:41 AM

समाजात पडणा-या प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधा. त्यातूनच नवे व्यवसाय सापडतील. तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्यात झोकून देऊन काम करा.

लोणीकंद : समाजात पडणा-या प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधा. त्यातूनच नवे व्यवसाय सापडतील. तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्यात झोकून देऊन काम करा. कष्टाची तर तयारी हवी. यशस्वी उद्योजक होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे, असे आवाहन उद्योजक डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले.वाघोली (ता. हवेली) येथील जेएसपीएम इम्पिरियल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व रिसर्च महाविद्यालयातील उद्योजकता विकास विभागा (ईडीसी)च्या वतीने ‘टेक्नो एंटरप्रेन्योर २ के १८’ कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे लोकमत माध्यम प्रायोजक होते.या वेळी लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, उद्योजक हरीश मेहता, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, आय नॉलेज फॅक्टरीचे प्रमुख आशिष दालिया, एस्पायरच्या वर्षा मराठे, एमसीईडी पुणेचे विभागीय प्रमुख सुरेश उमाप, आयडीईईचे विवेक तिवारी, ट्रिस लॅबचे साहील अरोरा आदींनी विविध सत्रांमध्येमार्गदर्शन केले. तसेच, जेएसपीएमचे संचालक डॉ. विवेक कायंदे,प्राचार्य डॉ. दिलीप शहा, प्रा. संजय जगताप, प्रा. अरुण ढवळे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.प्रश्न सर्वांना पडतात; पण त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. शिक्षण चालू असताना व्यवसायाचा शोध घ्या; निश्चित यशस्वी व्हाल, असे आवाहन निनाद देसाई यांनी केले. हरीश मेहता म्हणाले, ‘‘देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी युवकांनी बहुमूल्य योगदान देण्याची गरज आहे. उद्योजकच देशाला आर्थिक उंचीवर नेऊ शकतात. आव्हाने कितीही मोठी असली, तरी ज्याच्याकडे गुणवत्ता व नेतृत्वगुण आहे त्याला कोणी रोखू शकत नाही.’’या वेळी पराग कुलकर्णीलिखित ‘एअर डाऊन स्टोरी आॅफ इंजिनिअर हू फाइट आॅफ एम-थ्री फॉर लव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ईडीसीचे प्रमुख प्रा. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ. विवेक कायंदे व प्राचार्य दिलीप शहा यांनी स्वागत केले. तसेच, पीयूष थाडा, अमृता व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रजनी थिटे यांनी आभार मानले. सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.