खिंडकर म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह रुंगणांच्या नातेवाईकांची अवस्था वाईट असते. अशा वेळी त्याला प्लाझ्माची शोधाशोध करावी लागते. समाजात अनेक कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मादान करण्याची इछा असते. मात्र योग्य मार्गदर्शन तसेच गरजू रुग्णांची अनेक वेळा माहिती नसते. समाजमाध्यमांत व्हॉट्सॲपवर अनेक ग्रुपच्या माध्यमातून प्लाझ्मादान चळवळ चालविली जात आहे. अत्यातूनही अनेकांना मदत मिळते. मात्र अनेकदा योग्य दाता मिळतोच असे होत नाही. त्यामुळे वेळेवर प्लाझ्मा दाता आपल्यापासून जवळच्या ठिकाणावर मिळवा यासाठी कोविरक्षक या ॲपची निर्मिती केली आहे.
ॲपमुळे काय होईल फायदा
- प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करून प्लाझ्मादाता म्हणून नोंदणी करता येईल.
- प्लाझ्मादाताशी संपर्क करता येईल.
- प्लाझ्मादान केल्याने अनेकांचे जीवदान देण्यास कामी येऊ शकता.
- ॲपवर राज्य, जिल्हा, तालुका, भाग व रक्त गट निवडताच दात्यांची माहिती उपलब्ध.