शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची परवड

By admin | Published: May 23, 2017 5:08 AM

राठ झालेले केस, पायांत असल्याच तर रबराच्या बंधतुटक्या चपला, काळपटलेलं अंग, त्यावर ठिगळं लावलेली मळकट चिंधीसदृश्य कपडे, पाठीवर पोतंभर ओझं

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : राठ झालेले केस, पायांत असल्याच तर रबराच्या बंधतुटक्या चपला, काळपटलेलं अंग, त्यावर ठिगळं लावलेली मळकट चिंधीसदृश्य कपडे, पाठीवर पोतंभर ओझं आणि हातात कचरा निवडायची आकडी. बकाल वस्तीतलं राहणं. कचराकुंडीतील कागद, काच, पत्रा, प्लॅस्टिक वेगळं करून विकून चार पैसे मिळवणे, पत्रावळ्यांतलं खरकटं गोळा करणं, कधी काहीच नाही मिळालं तर भीक मागून दिवस ढकलणं, असं आयुष्य आहे, भोसरी परिसरातील शेकडो कचरावेचकांचे. ओल्या, सुक्या कचऱ्याने भरलेला टेम्पो, ट्रकची वाट पाहत या कचऱ्यातून आपल्या घराची चूल पेटवणाऱ्या भोसरी मोशीतील कचरावेचकांची स्थिती दयनीय आहे. कचरावेचक कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नाहीत. तसेच जीवघेण्या घाणीत, दुर्गंधीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे कचरावेचक कर्मचाऱ्यांची परवड कायम असून महापालिका प्रशासनाने त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा व आरोग्याचा विचार करण्याची मागणी होत आहे़भोसरी-आळंदी रस्त्यावरील मॅगझीन चौकाजवळ तसेच मोशी कचरा डेपो परिसरात काम करणाऱ्या कचरावेचकांचा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कचऱ्यातून आपली भाकरी शोधणारे कचरावेचक कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. भोसरी, लांडेवाडी, शांतीनगर, फुलेनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती या भागातील झोपडपट्टी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष कचरावेचण्याचे काम करत आहेत. कचरा वेचून त्यातील प्लॅस्टिक, काच, लोखंड, भंगार साहित्य इतर पुन्हा वापरण्यासारख्या वस्तू बाजूला केल्या जातात. त्यांची विक्री केली जाते. त्यातून कचरावेचकांना दिवसाला १०० ते २०० रुपये मिळतात. मात्र, कचरा वेचण्याच्या ठिकाणी असलेली दुर्गंधी, घाणीमुळे कचरावेचकांचे आरोग्य धोक्यात असते. त्यांना आजारांनी कायम ग्रासलेले असते. परिणामी आयुर्मान कमी होते. मुलांना शिकवण्याचा प्रयत्नदिवसभर कचऱ्यातून आवश्यक वस्तू बाजूला काढून त्याच्या विक्रातून कचरावेचकांचा उदरनिर्वाह चालतो. अशाही स्थितीत आपल्या मुलांना शाळेत घालून त्यांना शिक्षण देण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. १५ रुपये प्रतिकिलो प्लॅस्टिक, ८ रुपये प्रतिकिलो भंगार लोखंड, दोन रुपये किलो प्लॅस्टिक पिशव्या, एक रुपये किलो काच या भावाने कचऱ्यातून सामग्री काढली जाते. यामागे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण हा एकच हेतू असतो.