पुणे : आर्मी इन्स्टिट्यूटच्या निधी यादव आणि सौरभ सिंग यांनी ‘मॉस्किटो डिटेक्टर - काऊंट अँड अॅलर्टर’ या यंत्राची निर्मिती केली आहे. डास नष्ट करणे, या यंत्राचा उद्देश नसून साथीचे आजार पसरवून प्रसंगी मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या प्रजातीचा शोध घेणे, हा आहे. साथीच्या आजारांना रोखण्याकरिता हे यंत्र रुग्णाच्या स्वास्थ्याकरिता महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या यंत्राचे पेटंट मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत.
डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, हिवताप या प्रकारच्या साथीच्या आजारांपासून बचाव करण्याकरिता निधी आणि सौरभ यांनी तयार केलेल्या यंत्राची मदत होईल. निधी यादव आणि सौरभ हे विद्यार्थी आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनच्या दुसºया वर्षाला शिकतात. टाटा ग्रँड आयओटी या स्पर्धेकरिता त्यांनी हे संशोधन केले. सौरभ म्हणाला, ‘‘साथीचा आजार पसरवणारा डास ओळखण्यासाठी मॉस्किटो डिटेक्टर - काउंटर अँड अॅलर्टर हे उपकरण उपयुक्त ठरेल. त्या-त्या परिसरातील डासांच्या धोकादायक प्रजातींचे प्रमाण दिसताच परिसरातील व्यक्तींना संदेश पाठविण्याची सोय यात आहे. कोणत्या प्रकारचे औषध फवारून प्रतिबंध करता येईल, याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.’’आफ्रिकेतील एका जमातीला डासांचा रंग, आकार, शरीररचना यांवरून धोकादायक प्रजाती ओळखण्याचे ज्ञान अवगत असल्याचे वाचनात आले. डासांच्या पंखांच्या हालचालींच्या (विंग बीट फ्रिक्वेन्सी) आवाजाचा वेध घेऊन त्यांच्या प्रजाती ओळखण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. यासाठी स्टॅनफोर्ड विद्याापीठातील मोठा ‘डेटाबेस’ वापरण्याची संधी आम्हाला मिळाली.- निधी यादवच्उपकरणाकडे डास आकृष्ट झाल्यानंतर त्यांच्या पंखांच्या हालचाली टिपण्यासाठी अति उच्च क्षमतेचे मायक्रोफोन वापरण्यात आले आहेत.