पुणे : हेल्मेट नसणे, सिग्नल तोडणे, आदी वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, नियमभंग करणाऱ्यांवर जी दंडात्मक कारवाई केली जाते, त्यानुसार रोख स्वरूपात वाहनचालक दंड भरतात. मात्र, वाहतुकीच्या नवीन नियमानुसार वाहतूक पोलिसांनी इ-चलनाद्वारेच दंड आकारण्यास सांगितले आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाईन दंड भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० लाख ९९ हजार ६११ वाहनांवर ऑनलाईन दंड आकारण्यात आला.
११ लाख वाहनांवर दंड
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत तब्बल १० लाख ९९ हजार ६११ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात सर्वाधिक ७ लाख ५८ हजार ९८६ वाहनचालकांना ३९ कोटी ७६ लाख ४०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
...तर वाहनचालकांना सोडून द्यायचे का?
वाहतूक पोलिसांना, इ-चलन मशीनद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनाचालकांविरुद्ध दंड आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, जर दंड आकारण्यासाठी मशीन जवळ नसेल किंवा मशीनमध्ये बिघाड झाला असेल तर नियमभंग करणाऱ्यांना तसेच सोडून द्यायचे का? असा सवालदेखील विचारण्यात येतो आहे.
वाहतूक शाखेकडून जानेवारी ते ऑगस्टअखेर करण्यात आलेली कारवाई
प्रकार केसेस दंड
सीसीटीव्ही ७५८९८८ ३९७६००४००
डिव्हाइस १८९४६२ १२६२८१०००
टोईंग १५११६१ ७८९३६५००
........................................................................................................
एकूण १०९९६११ ६०२८१७९००