वानवडी : वानवडीतील भैरोबानाला चौकात वाहतूक पोलिसांकडून पीटीपी कारवाई करत असताना मुंबईतील उचभ्रू घरातील रहिवाशी असलेल्या महिलेच्या नावावरील चारचाकी वाहन (एम. एच. ०४ जी. झेड ३०५७) या वाहनावरील असलेला दंड २७ हजार २०० रूपये एकरकमी वसूल केला.
मुंबई ते पुणे ये जा करत असलेल्या या वाहनावर अनियंत्रित वेग मर्यादा व नो पार्किंग बाबत नियम तोडल्याने मागील दोन वर्षापासून ऑनलाईन दंड आकारले होते. हा दंड वाहनचालकाने वेळोवेळी भरला नसल्याने दंडाची ऐवढी मोठी रक्कम झाल्याचे वानवडी वाहतूक पोलीस निरिक्षक सुनील भोसले यांनी सांगितले.
वानवडी भागात भैरोबानाला चौक येथे वाहतूक विभागाकडून सुरु असलेल्या पीटीपी कारवाईत हे वाहन अडविले होते. त्यादरम्यान गाडीचा नंबर पोलीसांकडील मोबाईल ॲपवर टाकला व वाहनावरील दंडाची रक्कम खूप मोठी असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्रसिंह राजपूत, पो. ह. ज्योतीबा कुरुळे, पो. शि. ज्ञानेश्वर गायकवाड व बाबासाहेब जगताप यांच्या पथकाने हा दंड वसूल केला.