पुणे : वाहतूकीला शिस्त लागावी याकरिता पुणेकरांना वाहतूक नियमाचे आवाहन करणाऱ्या वाहतूक प्रशासनाला एक दिवसीय विशेष मोहिमेतून सर्वाधिक दंड विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांकडून मिळाला आहे. ५ जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या वाहतूक विशेष मोहिमेतून तब्बल ३ हजार ८६६ जणांवर विना हेल्मेट वाहन चालविणे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यातून वाहतूक विभागाला १९ लाख ३३ हजार रुपयांचा दंड मिळाला आहे. तर यादिवशी एकूण ३0 लाख २९ हजार ८00 रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वेगवेगळया मोहिमेचे आयोजन करण्यात येते. ५ जानेवारी रोजी विशेष मोहिमेतून बेशिस्त वाहनचालकांना दंड ठोठावण्याचे काम प्रशासनाने केले. वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे व पोलीस उपआयुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक शाखेतील २४ वाहतूक विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. नो पार्किंग, विना हेल्मेट, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल जंपिंग, वाहन परवाना जवळ न बाळगणे, रॉग साईडने वाहन चालविणे, विना गणवेश वाहन चालविणारे कँब व टँक्सी ड्रायव्हर आणि विना सीट बेल्ट यासारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. विशेष म्हणजे एका दिवसांत वाहनचालकांकडून वसूल केलेल्या दंडामुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल. कारवाई टाळण्याकरिता वाहनचालकांनी नियमांचे पालन करुन वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले......नो-पार्किंगमधून जमा ४ लाख २० हजार रुपये विशेष कारवाई एकूण केसेस एकूण तडजोड रक्कम नो-पार्किंग २१0२ ४,२0,४00विनाहेल्मेट ३८६६ १९,३३,000झेब्रा क्रॉसिंग ६९९ १,३९,८00सिग्नल जंपिंग ६३२ १,२६,४00वाहन परवाना नसणे ८९२ १,७८,४00रॉग साईडने वाहन चालविणे १७९ १,७९,000विनागणवेश वाहन चालविणे १२४ २४८00विना सीटबेल्ट १४0 २८000 एकूण ८६३४ ३0,२९,८00.........
दिवसभरात वाहनचालकांकडून वसूल केला ३० लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 1:40 PM
सर्वाधिक दंड विनाहेल्मेट कारवाईतून
ठळक मुद्देवाहतूक विभागाकडून विशेष मोहिमेचे आयोजन : दंडामुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास होईल मदत