राजगुरूनगर शहरात सह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवार रविवार कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. तसेच खेड पोलिसांनी जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ब्रेक द चेनला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र तालुक्यात वाढती संख्या लक्षात घेता पुढील काही दिवस तालुक्यात लॉकडाऊनसदृश स्थिती ठेवणे गरजेचे आहे.
शासनाच्या आदेशानंतर शनिवार रविवार व सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश असल्याने असल्याने त्याची नागरिकांनी आणि व्यापारी वर्गाने अंमलबजावणी केली चौकाचौकात पोलीस, होमगार्ड, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी नाकेबंदी केल्याने आणि शहरातील काही रस्ते बंद केल्याने लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी झाला. राजगुरुनगर आगाराने तालुक्यात जाणाऱ्या ७३ एसटी बस बंद केल्या असल्याने स्थानकात प्रवाशी फिरकले नाही.
चांडोलीच्या जवळील भीमा नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी बाद करण्यात आल्याने शहरात येणार आणि जाणारी पर्यायी मार्ग बंद झाल्याने अनेकांनी बाहेर पडणे टाळले. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवल्याने लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. विनाकारण शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर समज देण्यात आली. आस्थापना चालू ठेवल्याने ३ जणांवर १८८ प्रमाणे पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अत्यावश्यक सेवेमध्ये शहरातील मेडिकल, दवाखाने व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद होते.
नाकाबंदीमध्ये पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्यासह खेड पोलीस ठाण्याचे पोलीस, होमगार्ड आणि राजगुरुनगर नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
--
नाकाबंदी व बाजार बंदमुळे गर्दी झाली कमी
--
खेड तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आहेत. दोन दिवसांत ५३२ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तालुक्यात वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आता राहिला आहे. नागरिकांना सवलत दिल्यास ते मोठी गर्दी करतात. दोन दिवस लॉकडाऊन होणार म्हणून अनेक नागरिकांनी शुक्रवारी सर्वच बाजारात गर्दी केली होती. नागरिक गांभीर्य घेत नसल्याने संख्या वाढत आहे. राजगुरूनगर शहरात पाण्याची टाकी आणि धनश्री चौक, राक्षेवाडी फाटा, सातकर स्थळ, भीमा नदीवरील नवीन पूल, टाकळकरवाडी फाटा, टोलनाका या ठिकाणी पोलिसांनी नाका बंदी केली होती.
--
फोटो क्रमांक -१२ राजगुरुनगर लॉकडाऊन कारवाई
फोटो ओळ: राजगुरुनगर शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवरती पोलिसांनी कारवाई केली.
फोटो ओळ: पुणे -नाशिक महामार्गावर वाहनांचे प्रमाण कमी असल्याने शुकशुकाट जाणवत होता.
फोटो ओळ. शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये शुकशुकाट होता.