लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सायंकाळी सहानंतर संचारबंदी जाहिर केल्यानंतरही आपली दुकाने चालू ठेवणाºयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला असून, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी शहरातील ३० दुकाने सील करण्यात आली आहेत़ तसेच नियमांची अंमलबजावणी न करणाºया दुकानदारांकडून सुमारे चार लाख रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे़
महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सूचना केल्याप्रमाणे अनेक जण दुकाने सहा वाजता बंद न करता आपले व्यवहार चालू ठेवत आहेत़ तसेच काही ठिकाणी टपºयांवरच मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन करताना गर्दी होताना दिसत आहे़ यामुळे नियमांचा भंग करणाºयांवर कडक करावाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय पाच पथके आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आली आहेत़
दरम्यान शहरातील अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने सहा वाजताच स्वत:हून बंद केल्याचेही दिसून आले असून, प्रथम दोन दिवस दंडात्मक अथवा दुकाने सील करण्याची कारवाई न करता सायंकाळी सहा वाजता दुकाने बंद करण्याबाबत सूचना देण्याबाबतच पथकांना सांगण्यात आले आहे़ तसेच दुकांनांमध्ये सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे याबाबतही सांगण्यात येत आहे़ परंतु, ज्यांनी सायंकाळी सातनंतरही दुकाने सुरू ठेवली होती अशांवर महापालिकेने पहिल्या दिवशी कारवाई केली आहे़
------------------
अन्यथा तुळशीबाग बंद
तुळशीबागमध्ये तीन ठिकाणाहून प्रवेश करताना ग्राहकांचे टेंपरेचर तपासणे, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ तुळशीबागेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने, येथील प्रत्येक दुकानदारास दुकानात अथवा दुकानासमोर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे़ तसे न केल्यास तुळशीबाग पूर्णत: बंद केली जाईल असेही जगताप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
-----------------------------------