शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

सिम कार्ड विक्रीसाठी घेताहेत बोटांचे ठसे

By admin | Published: September 22, 2015 3:12 AM

‘कोणीही या अन् सिम कार्ड घेऊन जा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ प्रसिद्ध झाल्यानंतर सिम कार्ड विक्रीच्या कंपन्यांना जाग आली आहे.

पिंपरी : ‘कोणीही या अन् सिम कार्ड घेऊन जा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ प्रसिद्ध झाल्यानंतर सिम कार्ड विक्रीच्या कंपन्यांना जाग आली आहे. कागदपत्रांची शहानिशा, त्याच्या प्रत्येकी दोन प्रती अन् हातांच्या बोटांचे ठसे घेतल्यानंतरच आता सिम कार्ड दिले जात आहे. मोबाइलमधील सिम कार्ड रस्त्याच्या कडेच्या स्टॉलवर मिळते. मात्र, या ठिकाणी सिम कार्ड देताना संबंधित सिम कार्ड कंपनीकडून हवी तितकी खबरदारी घेतली जात नाही. गुन्हेगारांकडून अशा प्रकारे सिम कार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. अपुरी कागदपत्रे, फोटोही अस्पष्ट, मूळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी नाही की, कार्ड घेणारी व्यक्ती उपस्थित नसतानाही मिळणारे कार्ड, अशी परिस्थिती या सिम कार्ड विक्रीच्या स्टॉलवर दिसून आली. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये ही स्थिती समोर आली. प्रतिनिधींनी स्वत: कोणतीही कागदपत्रे न देता सिम कार्ड खरेदी केल्याबाबतचे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. संबंधित कंपनींच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेत स्टॉलधारकांना काही अटी घालून दिल्या आहेत. यापूर्वी कसलेही कागदपत्रे असले अथवा नसले, तरीही स्टॉलवर लगेचच सिम कार्ड दिले जात होते. आता कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची पूर्ण चौकशी केली जाते, तसेच कागदपत्रांचीही शहानिशा केली जात आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड या कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती आणि दोन फोटो घेतले जात आहेत. आता एकऐवजी दोन फोटो मागितले जात आहेत. दोन झेरॉक्स आणि फोटोंपैकी एक संबंधित स्टॉलधारकाकडे ठेवली जात आहे, तर दुसरी कंपनीला पाठविली जात आहे. ‘रेकॉर्ड’साठी एक प्रत आपल्याकडे ठेवली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. शिवाय, झेरॉक्स प्रतींवर सिम कार्ड घेणाऱ्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे आणि स्वाक्षरीदेखील घेतली जात आहे. पूर्वी एखाद्या कागदावरदेखील उपलब्ध होणारे सिम कार्ड मिळविण्यासाठी आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याने ‘सिम कार्ड’ कंपन्यांकडून ही काळजी घेण्यात आली आहे. शिवाय, पोलिसांकडूनही त्यांची नोंद ठेवली जात आहे. (प्रतिनिधी)