शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 3:02 AM

बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे  - बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील अनेक महिन्यांपासून केवळ ‘बस फायर आॅडिट’ खेळ खेळला जात आहे.पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाकडे ८१९ डिझेल व ५६३ सीएनजी अशा एकूण १३८२ स्वमालकीच्या बस आहेत. तर भाडेतत्वावरील ६५३ बस सीएनजीवरील आहेत. वर्ष २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १३ बसला आग लागली आहे. त्यामुळे पीएमपीच्या मालकीच्या बससह भाडेतत्वावरील बसही आहेत. दर महिन्याला एक याप्रमाणे बस जळून खाक होतआहेत. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात. पण हे उपाय तात्कालीक ठरत आहेत. सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अद्याप शेकडो बसमध्ये ही यंत्र नाहीत. आग लागल्यानंतर अद्याप एकाही चालक किंवा वाहनाने या यंत्राचा वापर केलेला नाही. काही महिन्यांपूर्वी बसचे फायर आॅडिट करण्याची घोषणाही आगीच्या धुरात विरून गेली. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेवर (सीआयआरटी) ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. एका खासगी संस्थेकडून हे आॅडिट करून घेण्याचेही नियोजन होते. पण अशी कोणतीही संस्थानसल्याचे समोर आले. एकासंस्थेला दिलेले कामही अधिक खर्चामुळे मागे घेण्यात आले. त्यानंतर आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय) या संस्थेकडून आॅडिट केले जाणार होते. पण तेही मागे पडले.आता प्रशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती तरी आगडोंब विझविणार का? हे येत्या काही दिवसांत समजेल. पण आतापर्यंत लागलेल्या आगींचे नेमके कारण समजले नसले तरी या आगी देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळेच लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसला आग लागण्यापुर्वी पुढील बाजूने धूर येतो. त्यानंतर लगेचच आग लागून संपूर्ण बस पेटते. चालकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण त्यामुळे या घटनांचे महत्व कमी होत नाही. बसची योग्य प्रकारे देखभाल नसल्यास केवळ आगच नाही तर कशाही प्रकारे अपघात होण्याची शक्यताआहे. जुन्या बसचे पीएमपीचेकारणही चुकीचे ठरत आहे.चार-पाच वर्षांपूर्वीच्या बसहीपेटल्या आहेत.दरमहा तांत्रिक परिक्षण : उपाययोजनांचा आढावाबस फायर आॅडिटसाठी पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीमध्ये एआरएआय, सीआयआरटी, आरटीओचे प्रत्येकी एक अधिकारी, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, महालक्ष्मी आॅटोमोटिव्ह, अँथनी गॅरेजचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, फायर आॅडिट कन्स्लटंट, पीएमपीचे दोन मुख्य अभियंता, भांडार अधिकारी व देखभाल अभियंता यांचा समावेश आहे.महामंडळाकडील डिझेल व सीएनजी बसचे दरमहा तांत्रिक परीक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीची बैठक होईल. त्यामध्ये बस फायर आॅडिट करून अहवाल सादर केला जाईल.समितीची २२ जानेवारी रोजी बैठक झाली असून त्यामध्ये उपाययोजनांचा आढावा तयार करण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.भाडेतत्वावरील बसकडे दुर्लक्षपीएमपी प्रशासनाने नुकतीच स्थापन केलेली समिती केवळ स्वमालकीच्या बसचेच आॅडिट करणार आहे. पण भाडेतत्वावरील बसबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.बुधवारी आग लागलेली बस भाडेतत्वावरील होती. या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. तरीही प्रशासन या बसकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.ठेकेदारांना सातत्याने पत्रव्यवहार करून सक्त ताकीद दिल्याचा दावा अधिकारी करतात. पण त्यानंतरही स्थिती सुधारताना दिसत नाही.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे