पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या ज्या इमारतीला आज दुपारी आग लागली होती. त्याच इमारतीत संध्याकाळी पुन्हा एकदा एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळावर धाव घेत आग विझवली आहे.
एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती ट्विट केली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ठिकाणी दुपारी आग लागली होती. त्याच ठिकाणी एका कन्पार्टमेंटमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती एएनआयने दिली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले वआगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ज्या ठिकाणी दुपारी आग लागली त्याच ठिकाणी पुन्हा आग लागल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. दुपारी लागलेल्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मुख्यमंत्री उद्या पुण्याला जाणार; सीरमच्या आग लागलेल्या युनिटची पाहणी करणार
दरम्यान, या नव्यानं लागलेल्या आगीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांची माहिती
सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आज दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या इमारतीत बीसीजीची लस निर्मिती केली जाते अशी माहिती नंतर समोर आली. सीरमचा मांजरी भागातील हा नवा प्लांट आहे. आगीचा आणि कोरोनावरील कोव्हिशिल्ड लशीचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. पण या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संध्याकाळी समोर आली. इमारतीत वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सीरम इन्स्टिट्यूट मोठी लस उत्पादक कंपनीजगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.