पिरंगुट : उरावडे रोडवर असलेल्या प्राज मॅट्रिक्स कंपनी मध्ये रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली असता ही आग नियंत्रणात आणण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांच्या वतीने करण्यात आले शेवटी दोन तासानंतर आगी वरती नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
उरावडे रोडवर असलेल्या या प्राज मॅट्रिक्स कंपनीमध्ये नवीन उत्पादनावरील संशोधनाचे काम चालू असते तेव्हा या कंपनीमध्ये रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली होती. परंतु या आगीचे कारण सध्या तरी अस्पष्ट असून या आगीमध्ये दुर्दैवीरित्या कोणती जीवितहानी झाली की नाही हे देखील समजू शकले नाही. परंतु या आगे मध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्राथमिक अंदाज बांधता कंपनीमध्ये संशोधनासाठी असलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आगे ची माहिती मिळतात स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते तेव्हा त्यांनी कंपनीच्या बाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळविले.
प्राज कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी पुणे शहरातून दोन अग्निशामक दलाचे बंब या सह दोन ऍम्ब्युलन्स घटना स्थळी दाखल झाले होते.शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगेवरती नियंत्रण मिळविले.
प्राज कंपनी ही बायो-इंधन आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात नावाजलेली कंपनी असुन या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उच्च विभुतीत इंजिनिअर तसेच शास्त्रज्ञ काम करीत आहेत तेव्हा या ठिकाणी संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलचा उपयोग केला जातो कदाचित त्यामुळेच ही आग लागली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.
या घटनेमुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचं कारण आणि नुकसानीचा अंदाज लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.