शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

भीषण आगीत कारखाना जळून खाक

By admin | Published: October 12, 2016 2:43 AM

: कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री आठ वाजेपर्यंत पुर्ण कंपनी जळुन राख झाली. जवळपास तीन तासा पेक्षा जास्त काळ चाललेल्या या आगीमुळे कुरकुंभ,पांढरेवाडी व परिसरातील रासायनिक कंपनीतील सारेचजण धास्तावले होते. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन दसऱ्याच्या सुट्टीमुळे जिवीत हानी टळली असल्याची प्राथमिक माहीती पुढे आली आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोमस ही पोलीअल व टोल्युन डाय आयसोयन (टी डी आय ) या रसायनाच्या रासायनिक प्रक्रीयेपासुन गाद्या बनवण्याचे उत्पादन करते. या औद्योगिक क्षेत्रामधील लघु उद्योग स्वरुपाची ही कंपनी असुन या ठिकाणी गाद्यांमध्ये वापरण्यात येणारा फोम उत्पादित केला जातो. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच अन्य कंपनीच्या माध्यमातुन आलेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या साठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र, कारगील, ओनर लँब, सिप्ला, एम क्युअर, दौंड नगर परिषदेच्या सह अन्य अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र पाण्याची कमतरता सातत्याने भासली. या घटनेचे प्रसंगावधान राखुन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रणात्मक कार्यवाही केली. रात्रीनंतर ही आग अखेरीस आटोक्यात आली. (वार्ताहर) महिन्याभरातील दुसरी घटना कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील एका महिन्याच्या आत झालेली ही दुसरी भयंकर घटना असुन त्यामुळे कुरकुंभ पांढरेवाडी येथील नागरिक अत्यंत भितीदायक वातावरणात असल्याचे जाणवते दरम्यान या स्पोटामुळे या औद्योगिक क्षेत्रामधील खदखद अजुन सुरुच आहे. एका छोट्या कंपनीत झालेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणे जर इतके कठिन असेल तर मोठ्या रासायनिक कंपनीला जर अशा प्रकारची घटना घडली तर काय परिणाम होतील याची प्रचीती येथील ग्रामस्थांना आली आहे.