शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

अग्निशामक केंद्र उभारावे

By admin | Published: April 25, 2017 4:19 AM

वडगावशेरी-चंदननगरचा झपाट्याने झालेला विकास पाहता नगर रोडवर अग्निशामक दलाचे केंद्र असणे ही काळाची गरज बनली आहे.

चंदननगर : वडगावशेरी-चंदननगरचा झपाट्याने झालेला विकास पाहता नगर रोडवर अग्निशामक दलाचे केंद्र असणे ही काळाची गरज बनली आहे. खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी नागरीकरण, औद्यागिकीकरण अतिशय झपाट्याने वाढले आहे अन् ते वाढतच चालले असून, या भागासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाचे केंद्र नाही.या भागात मोठमोठे मॉल, आयटी कंपन्या, खराडी एमआयडीसी आहे. नगर रोडवरील मॉलला आग लागण्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. पण अग्निशामक दलाचे बंब मात्र उशिरा पोहोचण्याचे प्रकार झाले. सध्या येरवडा येथे अग्निशामक दलाचे केंद्र आहे. तसेच चंदननगर, विमाननगर, वडगावशेरी ही लोकवस्तीची मोठी नगरे आहेत. आग लागल्यानंतर बंब उशिरा पोहोचतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. तर वडगावशेरीमध्ये ही आग लागण्याचे अनेक मोठे प्रकार घडले आहेत. वडगावशेरीसाठी येरवड्यातून येण्यास अधिक वेळ लागतो. हा विचार करून येथे अग्निशामक केंद्र गरजेचे आहे. वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र. ५मध्ये रामवाडीतील पाणीपुरवठा केंद्रालगतच मोठा भूखंड हा अग्निशामक केंद्रासाठी आरक्षित आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने हे अग्निशामक दलाच्या केंद्र उभारणीचे आरक्षण विकसित करण्यात आलेले नाही. तसेच अनेक ठिकाणी अनेक आरक्षित जागा आहेत, त्या धूळखात पडून आहेत. (वार्ताहर)