शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

जनजागृतीमुळे आगीवर नियंत्रण

By admin | Published: October 23, 2014 5:06 AM

अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षांपासून वर्षभर विविध उपक्रमांतून आणि प्रात्याक्षिकातून केलेल्या जनजागृतीला आता यश येऊ लागले

पुणे : अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षांपासून वर्षभर विविध उपक्रमांतून आणि प्रात्याक्षिकातून केलेल्या जनजागृतीला आता यश येऊ लागले असून, शहरात दिवाळीच्या सुमारास घडणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये घट होऊ लागली आहे़ काही वर्षांपूर्वी लक्ष्मीपूजनाला एकाच रात्री शहरात ५५ आगीच्या घटना घडल्या होत्या़ त्यात घट होऊन गेल्या वर्षी दिवाळीत केवळ दोन घटना घडल्या होत्या़ लक्ष्मीपूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातात़ विशेषत: व्यापारी पेठांमध्ये याचे प्रमाण मोठे असते़ रस्त्यावर उडविलेल्या जाणाऱ्या या फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडतात़ पेटते बाण गच्चीतील भंगार सामानावर पडल्याने, कचराकुंडीत पडल्याने आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत़ काही वेळा झाडांवर बाण अडकल्याने झाडाने पेट घेतल्याचे दिसून आले आहे़ याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्षभर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक संस्था, सोसायट्या येथे जाऊन प्रात्याक्षिके सादर करतात़ आपल्या संस्थेमध्ये असलेली आगप्रतिबंधक उपकरणे कशी हाताळावीत याची माहिती दिली जाते़ शहरातील मॉलमध्ये आग लागल्यास त्यावर कशी उपाययोजना करायची, याची प्रात्याक्षिके सादर केली जातात़ अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या तुळशीबागेतील व्यापाऱ्यांना प्रात्याक्षिके दाखविण्यात आली होती़ (प्रतिनिधी)