पिंपरी : तातडीची सेवा देणाऱ्या अग्निशामक विभागाच्या चार स्टेशनवर वीस लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराचा भार असून, जीवनदान देणाऱ्या या विभागाकडे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. अत्याधुनिक साधनसामग्रीची गरज आहे. पंधरा वर्षे साधनसामग्री, मनुष्यबळ, वेतनश्रेणी, पदोन्नतीसाठी झगडावे लागत आहे. या विभागास कोणीही वाली उरला नसल्याने अन्यायास वाचा कोण फोडणार, असा प्रश्न आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना जगणे असह्य होऊ लागले आहे. त्यांची मानसिक घुसमट होत आहे.मुंबई येथील काळबादेवी येथे एका इमारतीस लागलेली आग विझवायला गेलेल्या अग्निशामक विभागातील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अग्निशामक विभागातील प्रश्न, कर्मचारी संख्या, साधनसामग्री यांचा आढावा घेतला. त्या वेळी या विभागाकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे किंवा महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले. अग्निशमन कायद्यानुसार पन्नास हजार लोकसंख्येमागे एक पंपिंग युनिट आणि पाच किलोमीटरवर एक अग्निशामक दलाचे युनिट असणे गरजेचे असते. तसेच, प्रथम वर्ग विभागीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ साधनसामग्री असणे गरजेचे आहे. अनेक वर्षांनी मनपाला जागदुर्लक्षित राहिलेल्या या सरंक्षण साधनसामग्रीचा विषय स्थायी समितीने मंजूर केला आहे. आवश्यक बचाव, तसेच सुरक्षा साधने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ९३ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यानुसार फायरफायटिंग, फायर सूट घेण्यात येणार आहेत. अत्याधुनिक साधनांची गरजया विभागाकडे १२ वाहने आहेत. त्यापैकी दोन नादुरुस्त आहेत. वाहनचालक संख्या कमी असल्याने अनेक अडचणींना या विभागास सामोरे जावे लागत आहे. लाइफ सेव्हिंग संदर्भातील साधनसामग्री उपलब्ध असून, बदलत्या काळानुसार सामग्रीची गरज आहे. रासायनिक पदार्थांमुळे लागणारी आग, गॅस लिकेजमुळे लागणारी आग आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची उपलब्ध नाही.पंधरा वर्षे पदोन्नतीबाबत अन्याय१९८५पासून मनुष्यबळा संदर्भातील आकृतिबंध अजूनही बदलेला नाही. या संदर्भात नव्याने विचार सुरू असताना २०१३मध्ये क वर्गातून ब वर्गात महापालिका गेली. त्यामुळे आकृतिबंधात बदल झालेला नाही. प्रथम वर्ग दर्जाचा विभागीय अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अधिकारी व इतर पदे भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
अग्निशामक दल अस्वस्थ
By admin | Published: May 15, 2015 5:24 AM