वाऱ्याने आग पसरत पसरत गेली. किल्ले शिवनेरीच्या कडेलोट कड्याच्या खाली वनविभागाची हद्द जिथे सुरू होते तेथे तारेचे कुंपण आहे. तारेच्या कुंपणातून आग आत वनविभागाचे हद्दीत पसरली.किल्ले शिवनेरी परिसराला वनविभागाचे हद्द जेथे संपते तेथे दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. परिणामी आत मध्ये कोणतीही जनावरे चरावयास जात नाही. आत मध्ये मोठ्या प्रमाणात गवत आहे. ते पेटल्याने कडेलोट कड्याच्या दुसऱ्या बाजूचा संरक्षक भिंतीपर्यंत आग पोचली. आगीच्या मार्गात मध्ये दगडी संरक्षक भिंत आल्याने आग पुढे खाजगी क्षेत्रात पसरली नाही. आगीमुळे झाडांना मोठी झळ पोहोचली तसेच नैसर्गिक पद्धतीने रुजलेली लहान रोपे मात्र करपली.
किल्ले शिवनेरी परिसर विकास अंतर्गत वनविभागाने शिवनेरीवर आग प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे नियोजन होते. परंतु हा प्रस्ताव कागदावर राहिला आहे. जर दगडी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असते तर ही आग वनविभागाचे हद्दीत पसरली नसती. कुणी माथेफिरूने वा मद्यपीने ही आग लावली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वन विभागाचे २५ ते ३० कर्मचारी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. आग लावणाऱ्या या समाजकंटकांना शोधणे अवघड आहे. या वणव्यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्यात येईल तसेच त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे अजित शिंदे यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : २६ जुननर शिवनेरी आग
फोटो ओळ शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी परीसरात वनवीभागाच्या हद्दीत अज्ञात कारणाने लागलेल्या वनव्याने धुरामुळे किल्ले शिवनेरी काळवंडुन गेला होता.