पाषाण: बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबच्या बंद पडलेल्या जुन्या कार्यालयाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात हॉटेलच्या कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे बाणेर परिसरात मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पहायला मिळत होते. सदर आग पावसामध्ये लागल्याने आग लागली की लावण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.बाणेर येथील प्रसिद्ध असलेले हॉटेल पॅन कार्ड क्लब ला सेबी ( सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) सील केल्यानंतर त्याचे एखाद्या खंडर सारखे स्वरूप झाले आहे. बंद असलेल्या या हॉटेलला अचानक पणे कार्यालयात आग लागली व कार्यालयातील फायली बिले जळून खाक झाली आहेत.अग्निशामक दलाच्या जवानांना गुरुवारी साडेअकरा वाजता पॅन कार्ड क्लब येथे आग लागण्याचा कॉल आला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अग्निशामक दलाच्या जवानांना तीन तास परिश्रम घ्यावे लागले. तीन तासानंतर आग आटोक्यात आणून कूलिंग चे काम जवळपास पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत सुरू होते.मुख्य कार्यालय, औंध व पाषाण येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणून येथील साहित्य वाचवण्याचे काम केले. हे हॉटेल मोठ्या परिसरात वसलेले असून त्यापैकी चार ते सहा हजार स्क्वेअर फूट परिसराला आग लागली होती. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाचे कमलेश सांगळे यांनी दिली.
बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 8:18 PM