पुणे : लष्कर भागातील हॉटेलच्या भटारखान्यात गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना रविवारी (दि. ३१) घडली. प्रसंगावधान राखत भटारखान्यातील कामगार बाहेर पळाल्याने माेठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
लष्कर भागात सरबतवाला चौकात साहिल हाॅटेलच्या भटारखान्यात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. भटारखान्यातील कामगार त्वरित बाहेर पडल्याने अनर्थ टळला.
जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, रोहित रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. भटारखान्यातील चार सिलिंडर बाहेर काढण्यात आल्याने गंभीर दुर्घटना टळली. एक सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याचे गायकर यांनी सांगितले.
.....
फोटो